नेपाळमध्ये भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर-पश्चिम नेपाळमध्ये बुधवारी पहाटे एकापाठोपाठ भूकंपाचे दोन धक्के बसले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संशोधन केंद्रानुसार, भूकंपाचा पहिला धक्का 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पहाटे 1 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर पहाटे 4 वाजून 28 मिनिटांनी दुसरा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू मुगु जिल्ह्यातील कलाई भागाजवळ होता. शेजारील डोल्पा आणि जुमला जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.