UPI शुल्काला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, एमडीआरविरोधात याचिका दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

यूपीआय पेमेंटवरील शुल्काचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यापारी यूपीआय पेमेंटवर आकारण्यात आलेल्या शुल्काला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅडव्होकेट अंजन दत्ता यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अ‍ॅडव्होकेट अंजन दत्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेत 14 डिसेंबर रोजी जारी केलेली अधिसूचना आणि 15 सप्टेंबर रोजी जारी केलेली एमडीआर फ्रेमवर्क रद्द करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय पूर्णपणे घटनाबाह्य आणि चुकीचा असून, सरकारने पुरेशा कायदेशीर आधाराशिवाय हा निर्णय घेतला आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

राहुल गांधींकडून सरकारवर निशाणा

यूपीआयवरील शुल्कावरून विरोधी पक्ष सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या यूपीआयवरील शुल्कावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी यूपीआय कर मागे घ्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.