
मुंबईला 100 टक्के जाणार म्हणजे जाणार, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा आरक्षणासाठी गेल्या अठरा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. सरकार आणि जरांगे यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केले. तेव्हापासून ही कोंडी कायम आहे. 12 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे मनोज जरांगे यांनीआंतरवालीतून मुंबईकडे प्रस्थान केले. यातच पाटोद्यात आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी मुंबईला उद्या जाणार म्हणजे जाणारच.” ते म्हणाले, “मला सलाईन लावण्यात येत आहे. त्यामुळे उद्या दुपारी १ वाजता माझ्यासह सतरा लोक आझाद मैदानात पोहचणार आहेत. कोण मला अडवते ते पाहातो.”
ते म्हणाले आहेत की, “मी 100 टक्के मुंबईला जाणार म्हणजे जाणार. रात्रीतून सलाईन घेणार. सरपंच ड्राफ्ट घेऊन येत आहेत. आजचा दौरा थांबला. पण उद्याही त्या मार्गाने मी जाऊ शकतो. मी 18 तारखेला आझाद मैदानावर 10 वाजता जाणार आहे.”




























































