पळसदरी आणि खोपोली दरम्यान दोन महिने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रॅक रिन्यूअल कामासाठी पळसधरी आणि खोपोली दरम्यान दर गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी दोन महिन्यांसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. 18 सप्टेंबरपासून मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येईल.

18 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कालावधीत, दर आठवड्याला गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी पहाटे 1.30 ते 4.30 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकच्या कालावधीत पळसधरी आणि खोपोली दरम्यान उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

ब्लॉक कालावधीत खोपोली येथून 00.30 वाजता सुटणारी खोपोली-कर्जत उपनगरी ट्रेन रद्द राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 23.18 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-खोपोली उपनगरी ट्रेन कर्जत स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

ब्लॉकपूर्वी खोपोलीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जाणारी शेवटची लोकल 22.57 वाजता सुटेल. ब्लॉकपूर्वी खोपोली येथून सुटणारी शेवटची उपनगरी ट्रेन 23.20 वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर खोपोलीला जाणारी पहिली उपनगरी ट्रेन कर्जत येथून पहाटे 05.43 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर खोपोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी पहिली उपनगरी ट्रेन पहाटे 04.50 वाजता सुटेल.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.