निवडणूक आयोग आणि भाजप मिळून पक्ष चोरतात! राहुल गांधी यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेस हे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जोरदार टीका केली. ‘‘निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष दोघे मिळून पक्ष चोरतात,’’ असा हल्ला राहुल यांनी चढवला.

राहुल गांधी यांनी यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. पक्ष फुटीच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकांवरच राहुल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस… प्रत्येक वेळी एकच पॅटर्न दिसत आहे. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडतात. नंतर त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतात. मत चोरी, सरकार चोरी आणि आता पक्ष चोरी हे आमच्या लोकशाहीच्या पतनाचे प्रतीक बनले आहेत,’’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.

‘‘निवडणुकीमध्ये लोकांनी दिलेला जो काwल आहे, त्याचे संरक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबादारी आहे. मात्र ही संस्था अशा लोकांना मदत करते, जे लोकांनी दिलेला निकालच फिरवून टाकतात,’’ असा आरोपही त्यांनी केला.

ही लढाई फक्त ममतांची नाही!

‘‘ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची नाही. निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष व्हाव्यात असा आग्रह धरणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाची आहे,’’ असे राहुल म्हणाले.

आख्खाच्या आख्खा पक्ष जर चोरी केला जाऊ शकतो तर कोटय़वधी भारतीय मतदारांच्या मतांच्या चोरीमध्ये आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नाही.