
लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. या व्यवस्थेला अभ्यासू विद्यार्थी नको आहेत, तर अंधभक्त हवे आहेत. विद्यार्थी प्रश्न विचारतो आणि जिज्ञासू असतो, याच कारणामुळे सध्याच्या व्यवस्थेला विद्यार्थ्यांची भीती वाटते, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी न्यायव्यवस्था, इतर स्वायत्त संस्था आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थी कोणतीही गोष्ट मुकाट्याने स्वीकारत नाहीत. संस्था आपले काम योग्य प्रकारे का करत नाहीत? असा सवाल तो विद्यार्थी करतो. तरुण पिढीमध्ये प्रश्न विचारण्याची सवय कायम राहिली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. केवळ कोणीतरी सांगितले म्हणून विद्यार्थी एखादी गोष्ट खरी मानत नाही, तर त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. याच गोष्टीचा व्यवस्थेला धोका आहे. ‘अंधभक्त’ची मानसिकता असणारे कधीही प्रश्न विचारत नाही. उत्तरे मागण्याऐवजी प्रत्येक गोष्ट डोळे झाकून स्वीकारणाऱ्या लोकांनाच ही व्यवस्था प्रोत्साहन देते. विद्यार्थी दुसऱ्याचे ऐकून घेतो, प्रश्न विचारतो आणि नंतर आपले मत मांडतो. याउलट ‘अंधभक्त’ या मानसिकतेत द्वेष, अहंकार आणि भीती असते. विद्यार्थी महिलांचा आदर करतो, तर अंधभक्तांच्या मानसिकतेत महिलांच्या अनादराला स्थान मिळते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
शाळा-कॉलेजांची अवस्था अशी का आहे? पेपर लीक का होत आहेत? आणि तरुणांना रोजगार का मिळत नाही? असे प्रश्न विद्यार्थीच विचारत असतात. त्यामुळेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असे म्हणत राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात पेपरफुटीपासून ते रोजगारापर्यंतच्या विविध प्रश्नांना विद्यार्थ्यांच्या आवाजाशी जोडले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपल्या समस्या राहुल गांधींसमोर मांडल्या. एका विद्यार्थ्याने आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, जमिनींचे पट्टे, रिक्त पदे आणि सरकारी वसतिगृहांची दयनीय अवस्था यावर बोट ठेवले. हे प्रश्न मांडणाऱ्या तरुणांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्याने केला. दुसऱ्या एका विद्यार्थ्याने सरकारी भरती आणि पेपर लीकबाबत तक्रार मांडली. भरतीप्रक्रियेवर प्रश्न विचारल्यास विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जातात आणि त्यांना तुरुंगात पाठवले जाते. सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी यावेळी त्या विद्यार्थ्याने केली. तसेच आणखी एका विद्यार्थ्याने विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया आणि मूल्यमापनाबाबतची आपली तक्रार मांडली. मेरीट असूनही आपल्याला पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासासाठी प्रवेश मिळाला नाही आणि गुणपत्रिका मागितल्यावर विद्यार्थ्याने केला.




























































