
मध्य रेल्वे गणपती उत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवासासाठी १८ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण दरम्यानच्या ‘मेन लाईन’वर दिनांक २३/२४.०९.२०२६ (बुधवार/गुरुवारची रात्र), दिनांक २४/२५.०९.२०२६ (गुरुवार/शुक्रवारची रात्र) आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ (शुक्रवार/शनिवारची रात्र) या दिवशी चालवण्यात येतील.
‘हार्बर लाईन’वर, केवळ गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच दिनांक २५/२६.०९.२०२६ (शुक्रवार/शनिवारची रात्र) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी ४ विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.
या विशेष गाड्या पुढे दिलेल्या वेळेनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील.
> डाऊन मेन मार्गावर (दिनांक २३/२४.०९.२०२६; दिनांक २४/२५.०९.२०२६ आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष १: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१:४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३:१० वाजता पोहोचेल.
> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-ठाणे विशेष १: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२:३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३:३० वाजता पोहोचेल.
> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ३: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३:२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४:५५ वाजता पोहोचेल.
> अप मेन मार्गावर (दिनांक २३/२४.०९.२०२६; दिनांक २४/२५.०९.२०२६ आणि दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी)
कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २: कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१:३० वाजता पोहोचेल. ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ही गाडी ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.०० वाजता पोहोचेल.
> ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ ही गाडी ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
> अप हार्बर मार्गावर (केवळ दिनांक २५/२६.०९.२०२६ रोजी) पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २ ही गाडी पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.२० वाजता पोहोचेल.
> पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ४ ही गाडी पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.





























































