
सोशल मीडियावर एका छकुलीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही लहानगी बाप्पाबरोबर मोदकांची वाटणी करतेय. बाप्पाला ती म्हणतेय ‘ए बाप्पा, तू टेन्शन नको घेऊस. मी सगळे मोदक खाऊन दाखवते.’ ती छकुली मोदक मोजण्यात मग्न होते. पण तिला 9 च्या पुढचे अंकच आठवत नाहीत. ती 9 नंतर 12, 13, 17 आणि ओकोणीस असे मोदक मोजते. एका मोदकाकडे बोट दाखवत म्हणते, ‘तू हा मोदक खा.’ ‘तुझ्यासाठी आई रोज मोदक बनवणार आहे.’ छकुलीचा व्हिडिओ @mahira_narwade या इन्स्टा आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.
6.5 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून. नेटिझन्स कमेंट्समध्ये चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एकाने लिहिलेय, ‘कोपर्निकसचा भाऊ ओकोणीस.’ अन्य एकाने ‘ओकोणिसवाला मला ठेव. बाकीचे तू खा’ अशी कमेंट केलीय.
































































