Nanded News – कुंडलवाडी-शेळगाव थडी रस्त्यावर भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुंडलवाडी ते शेळगाव (थडी) जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी (दि. 24 सप्टेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेळगाव थडी गावाजवळील वळणाजवळ कारची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.

या अपघातात पुष्पा उर्फ सुमलता गंगाधर चिद्रावार (वय 32) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंगाधर विजय चिद्रावार (वय 40) यांचा उपचारादरम्यान बिलोली रुग्णालयात मृत्यू झाला. दोघेही देशमुख नगर, बिलोली येथील रहिवासी होते. दोघेही0 मोटारसायकलवरून प्रवास करीत होते. कुंडलवाडी ते शेळगाव थडी रस्त्यावरील वळणाजवळ दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव पाटील, पोहेकॉ संतोष संगेवार व शिवराज गंगुलवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.