
चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बामणोली गावचे सरपंच सुदेश गमरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच विविध गावांतील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कामगार नेते विनोद कदम यांच्या पुढाकाराने आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी रामपूरचे अशोक जाधव, नायशीचे संतोष कदम, निवळीचे दिलीप पवार, ढाकमोलीचे यशवंत जाधव, तळवडेचे संतोष विचारे, पोफळीचे दिलीप मोहिते आणि नांदगावचे संतोष जाधव यांचा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सुदेश गमरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्षांचे अभिनंदन केले. ग्रामपातळीवर काम करताना लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि गावांच्या विकासाला गती देण्यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहू, तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद उर्फ पिंट्या निवळकर, नगरसेवक फैसल कास्कर, पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष जयरत्न कदम गुरुजी, कामगार नेते महेश सावंत, वंचित बहुजन आघाडीचे चिपळूण अध्यक्ष संदीप गमरे, समाजभूषण पुरस्कर्ते के. डी. कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.






























































