
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुदुपारच्या सत्रात सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र इतर प्रकरणांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात न्यायालयीन कामकाजाची वेळ संपली आणि सुनावणीसाठी 30 सप्टेंबरची तारीख न्यायालयाने दिली.
सरन्यायाधीश चार महिन्यांनी निवृत्त होणार
सध्या सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुशिवसेनेची सुनावणी सुरू आहे. कांत हे चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी 2027 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीआधी शिवसेनेच्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा फैसला होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






























































