
परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळ आणि शिवराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पातळीवर घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा व गणराज चषकचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक भायखळा येथील राणीबागचा राजा अर्थात पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला. दुसरा क्रमांक गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तर तिसरा क्रमांक धारावीच्या श्री हनुमान सेवा मंडळाने पटकावला.
सुभाष डामरे मित्र मंडळाने शिवराज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक आनंद गांवकर व संचालक, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेते संजय सावंत, नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे परीक्षण संजय तोडणकर, अमर जाधव यांनी तसेच रुपेश कोचरेकर, अभिषेक गवाणकर यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहिले.
…आणि विजेते आहेत
उत्तेजनार्थ पुरस्कार मालवणी येथील युवक उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले येथील श्री साईराज गणेशोत्सव मंडळ, नायगाव येथील गं. द. आंबेकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (काळेवाडीचा विघ्नहर्ता), लोअर परळ येथील रुस्तम रहिवाशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (निसर्गाचा राजा), ठाकुरद्वार येथील धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर कोकणीपाडा येथील श्रद्धा मित्र मंडळ, परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना देण्यात आले. उत्कृष्ट मूर्तीसाठी बाळकृष्ण मित्र मंडळ (मरोळचा विघ्नहर्ता), खेतवाडी 12वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्याचा पुरस्कार शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना जाहीर करण्यात आला.




























































