गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या कामाला वेग, ‘तुळशी’ने 64 मीटरचे खोदकाम केले पूर्ण; ‘विहार’ची जोडणी 92 टक्के पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जेएमएलआर) प्रकल्प टप्पा 3 (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) बांधण्यात येणाऱया दुहेरी बोगद्याच्या कामाने वेग घेतला आहे. गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) 5.30 किलोमीटर लांबीचे प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत.  त्यापैकी ‘तुळशी’ या पहिल्या टीबीएमने आतापर्यंत बोगद्याचे 64 मीटर खोदकाम पूर्ण केले आहे, तर ‘विहार’ या दुसऱया टीबीएमने सुटे भाग जोडण्याची कार्यवाही 92 टक्के पूर्ण झाली आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत दुसऱया बोगद्याचे खोदकाम पूर्ण होणार आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी आज प्रकल्पस्थळास भेट देऊन पाहणी केली. बोगदा खणून कार्यपद्धती, सुरू असलेले खणनकार्य, प्रकल्पाची सद्यस्थिती व प्रगती तसेच विविध तांत्रिक बाबींची माहिती बांगर यांनी घेतली. आतापर्यंत बोगद्याचे 64 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे पंकणापृतीकडे उभारण्याचे कामदेखील वेगात सुरू आहे. यानुसार 64 मीटरच्या खोदकामादरम्यान, तुळशी संयंत्राच्या मदतीने तब्बल 27 पंकणापृती कडादेखील उभारण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त तात्पुरत्या स्वरूपातील 2 पंकणापृती कडांचीही उभारणी ‘तुळशी’च्या मदतीने करण्यात आली आहे.