
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील तिस्ता नदीत वाहून चाललेल्या हत्तीच्या तीन-चार दिवसांच्या पिल्लाचा जीव मच्छीमारांनी वाचवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पाण्याच्या प्रवाहावर या पिल्लाची फक्त सोंड दिसत होती. हे पिल्लू वाहून जात असल्याचे पाहताच स्थानिक मच्छीमारांनी बोटीच्या सहाय्याने त्याला सुरक्षित बाहेर काढले. यानंतर बैकुंठपूर वन विभागाचे कर्मचारी आणि मच्छीमारांनी परिसरात दोन तास शोधमोहीम राबवली. अखेर पिल्लाच्या आवाजाने आई धावत आली आणि त्यांची भावुक पुनर्भेट झाली. संकटसमयी मच्छीमारांनी दाखवलेले हे धाडस आणि मानवी संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्हिडीओ @rameshpandeyifs या ‘एक्स’ पोस्ट अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
https://x.com/rameshpandeyifs/status/2102222638190080050






























































