Asian Games – 56 वर्षांचा दुष्काळ महाराष्ट्राच्या वाघाने संपवला; उंच उडीत सर्वेश कुशारेने जिंकलं रौप्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने नेत्रदिपक कामगिरी करत संबंध हिंदुस्थानाची मान अभिमानाने उंचावली आहे. पुरुषांच्या उंच उडीत त्याने धडाकेबाज कामगिरी करत रौप्यपदकावर मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे उंच उडीत तब्बल 56 वर्षांनंतर हिंदुस्थानच पदक जिंकण्याच स्वप्न सर्वेशने पूर्ण केलं आहे. यापूर्वी 1970 साली भीस सिंह यांनी या प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं.

सर्वेश कुशारेने अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवली होती. 2.25 मीटरची सर्वोत्तम उडी मारत त्याने त्याने चायनीच तैपेईच्या चाओ-हुसान फूला कडवी झुंज दिली. चाओनेही 2.25 मीटरटची उडी मारली होती. दोघांचाही खेळ अंतिम फेरीत दमदार राहिला. मात्र, काउंटबॅकच्या नियमानुसार सुर्वेश कुशारेच्या हातून सुवर्ण पदक निसटलं. परंतू सर्वेश कुशारेने जिंकलेलंल रौप्य महाराष्ट्रासह देशाच्या शिरपेचात मानाचा तुर रोवणारं ठरलं आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील उंच उंडीत पदक जिंकणारा सर्वेश हिंदुस्थानचा तिसरा आणि 56 वर्षानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1954 साली अजित सिंह भल्ला यांनी हिंदुस्थानला पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर 1966 साली भीम सिंह यांनी सुवर्ण आणि 1970 साली कांस्यपदक जिंकलं होतं. मात्र, त्यानंतर एकाही खेळाडूला उंच उडत पदक जिंकला आलं नव्हत. मात्र, हा दुष्काळ सर्वेश कुशारेने संपुष्टात आणत इतिहास रचला आहे.