
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज पासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. मालिका सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी किंग कोहलीने इतिहा रचला. विराट कोहलीने हिंदुस्थानचा माजी कर्णधार मोहम्मद अजरुद्दीनचा 28 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला आहे.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील वेस्ट इंडिजविरुद्धचा 44 वा एकदिवसीय सामना आहे. या सामन्यासह विराट कोहली आता वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अजरुद्दीनच्या नावावर होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 43 खेळले होते. या यादीमध्ये कपिल देव (42), राहुल द्रविड (40) आणि एमएस धोनी व सचिन तेंडुलकर (प्रत्येकी 39) या खेळाडूंचा समावेश आहे. या मालिकेदरम्यान कोहलीच्या निशाण्यावर आणखी काही मोठे विक्रम असणार आहेत. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा जागतिक विक्रम वेस्ट इंडीजचा पूर्व कर्णधार शिवनारायण चंद्रपॉल (46 सामने) याच्या नावावर आहे, ज्याच्याशी बरोबरी करण्याची संधी चालू मालिकेतील सामन्यांद्वारे कोहलीकडे असेल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात जर कोहलीने शतक झळकावले, तर कॅरेबियाई संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 शतके करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरेल. या ऐतिहासिक सामन्यात कोहलीच्या नजरा एका अत्यंत दुर्मिळ विक्रमावरही आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ 59 धावांची आवश्यकता असून, सध्या 314 सामन्यांत 14,941 धावा त्याच्या नावावर आहेत. जर त्याने या सामन्यात 59 धावा केल्या, तर क्रिकेट जगतात या फॉरमॅटमध्ये 15 हजार धावा पूर्ण करणारे तो सचिन तेंडुलकरनंतर केवळ दुसराच फलंदाज ठरेल.























































