पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील उद्या सहभागी होणार आहेत व विद्यार्थ्यांसोबत बसून संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांची आज विद्यार्थी नेते विवेकानंद पाटील यांच्याशी चर्चा झाली. ‘एखाद्याने किती निर्दयी असावं हेच समजत नाही. हजारो-लाखो विद्यार्थी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना नाकारत आहेत. मात्र ते हटायला तयार नाहीत. गद्दार ज्ञानेश कुमार यांच्याकडून त्यांनी धडे घेतले की काय? आता विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या दारात येऊन बसायचे का, मग तुम्ही राजीनामा द्याल का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.