
दुष्काळ पाहणी दौऱयावर गेलेले मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यावर आज यवतमाळमधील दारव्हा मानकिन्ही येथे संतप्त शिवसैनिकांनी कोंबड्या फेकल्या आणि व्होट चोर, कोंबडी चोर अशा घोषणा दिल्या.
नितेश राणे यांच्या गाडय़ांचा ताफा मानकिन्ही येथे पोहचताच कोंबड्या हातात घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले. काही शिवसैनिकांच्या हातात कोंबडी चोर, मुर्गी चोर, व्होट चोर असे फलकही होते.
गाड्या भरधाव असतानाही शिवसैनिकांनी आडवे जात गाडय़ांवर कोंबड्या फेकल्या. कोंबडी चोर हाय हाय, मुर्गी चोर हाय हाय, व्होट चोर चले जाव, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दुष्काळी पाहणीचा दिखावा कशासाठी?
मानकिन्ही येथील तलावाची पाहणी करण्यासाठी नितेश राणे आले होते. भीषण दुष्काळ आहे. तलावात थेंबभरही पाणी उरले नाही मग मंत्री नेमकी पाहणी कसली करत आहेत, कशाला उगाच दिखावे करता, असा संतप्त सवाल रवी तरटे यांनी केला.


























































