दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोट्यवधींची मौलव्यान रत्ने जप्त, बँकॉकहून आलेल्या प्रवासी ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मौल्यवान रत्ने आणि दागिन्यांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची मौल्यवान रत्ने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका हिंदुस्थानी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या रत्नांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 11,54,600 रुपये इतकी आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रवासी बँकॉकहून दिल्लीला आला होता. टर्मिनल 3 वर प्रवाशाची तपासणी करत असताना सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आला. यानंतर अधिकाऱ्यांनी सामानाची कसून तपासणी केली असता 3200 मौल्यवान रत्ने आणि दागिने आढळले. चौकशीदरम्यान प्रवाशाने गुन्ह्याची कबुली दिली. प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.