
मनालीहून परतत असताना पर्यटकांची खासगी बस उड्डाणपुलावरून खाली कोसळून चौघांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील बंगाजवळ मजारी गावात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बसमध्ये लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि इतर अनेक पर्यटक प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ज्योत्स्ना जॉर्ज आणि विशाल अशी दोन मृतांची नावे आहेत.
























































