विरोधी पक्षाच्या खासदारांचा आज निवडणूक आयोगाला घेराव; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘इंडिया आघाडी’चा दिल्लीत ‘लोकशाही वाचवा मोर्चा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election-commission-to-issue-interim-order-on-tmc-party-symbol-rival-factions-stake-claim-ahead-of-nandigram-by-election

घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षांचे सर्व खासदार मंगळवारी ‘लोकशाही वाचवा मोर्चा’ काढणार असून निवडणूक आयोगाला घेराव घालणार आहेत.

मतचोरी आणि निवडणूक घोटाळय़ाच्या विरोधात देशभरात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. अनेक राज्यांत विद्यार्थी आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असून ‘ज्ञानेश कुमार हटाव’ अशी मागणी होत आहे. इंडिया आघाडीनेही देशभरात मोठय़ा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याची सुरुवात मंगळवारी निवडणूक आयोगाला घेराव घालून होणार आहे. विरोधी पक्षाचे सर्व खासदार संसद भवनपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

भ्रष्ट निवडणूक आयोगाविरोधात सुमारे दोन महिने चालणाऱ्या आंदोलनाची माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसद भवनाच्या मकरद्वारावर एकत्र येणार आहेत. त्यानंतर 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा शांततापूर्ण असेल, असे जयराम रमेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कुठे – संसद भवन ते आयोग मुख्यालय

कधी – सकाळी 11 वाजता