Video – गाय झाली सुपर मॉडेल… व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धम्माल प्रतिक्रिया

सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, कोण काय अपलोड करेल याचा काहीही भरवसा देता येत नाही. प्राण्यांसंदर्भातील अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी बऱ्याचदा व्हायरल होत असतात. अशाच प्रकारच्या एका व्हिडीओमध्ये चक्क गायीने कॅटवॉक करून दाखवला आहे.

या व्हिडीओमध्ये गाय रस्त्यावरून चालताना दिसते आहे. पण इतर गायींप्रमाणे न चालता तिची चाल वेगळी असल्याचं दिसतं आहे. एखादी मॉडेल कॅटवॉक करते काहीशा तशाच प्रकारे पायांची हालचाल करून, अंग मुरडत रस्त्यावरून चालताना दिसतेय. गायीच्या या अनोख्या पद्धतीने चालण्यावर यूझर्सनी देखील मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाहनावर लागलेल्या कॅमेऱ्याध्ये रेकॉर्ड झालेली ही क्लिप सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. गायीच्या विशिष्ट पद्धतीने पाय पुढे मागे करून चालण्याच्या पद्धतीकडे बघून सर्वच जण अवाक् झाले आहेत. बऱ्याच यूझर्सनी गायीच्या अशा चालण्याची तुलना ‘कॅटवॉक’सोबत केली आहे.

व्हिडीओमध्ये एक तपकिरी आणि पांढऱ्या रंगाची गाय रस्त्याच्या मध्यभागी एखाद्या मॉडेलप्रमाणे चालताना आणि डोकं विशिष्ट पद्धतीनं हलवून चालत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या मागे अन्य गायी पण दिसत आहेत. त्या पण त्या कॅटवॉक करणाऱ्या गायीप्रमाणे चालत नाहीत, हे स्पष्ट दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडियो कोणत्या देशातला आहे, याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या