दारूड्याच्या उपद्व्यापाने सँडहर्स्ट रोड स्थानकाची नासधूस

सामना प्रतिनिधी, मुंबई

हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड स्थानकात दारुड्याच्या उपद्व्यापाने प्रवाशांचा गैरसमज होऊन जमावाने स्थानकाची नासधूस केल्याचा विचित्र प्रकार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या दारुड्यास स्थानक परिसरातून बाहेर काढण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांना प्रवाशांचा गैरसमज झाल्याने वाद पेटत गेला. त्यातून जमावाने तिकीट खिडक्यांना लक्ष्य केले. डोंगरी पोलिसांनी हस्तक्षेप करून दारुडयास ताब्यात घेऊन हिंसक जमावाला शांत केले.

सँडहर्स्ट रोड स्थानकात तिकीट स्थानकाजवळील मोकळ्या जागेत एक दारुडा झिंगून पडला होता. सायं. 5.15 च्या सुमारास एका पॉइंट्समनने त्यास उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नांचा उपयोग होत नसल्याने उद्घोषणा करून रेल्वे सुरक्षा बलाच्या आरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या दारुड्यास आवरताना तिथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. या दारुड्याने स्वतःलाच काही जखमा केल्याने आरपीएफचे जवान आणि रेल्वेचे कर्मचारी या दारुड्यास मारहाण करीत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. त्यामुळे संतप्त जमावाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. डोंगरी पोलिसांनी या दारुड्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

summary- a drunk man created chaos at sandhurst station

आपली प्रतिक्रिया द्या