शिंदे गटाला एकच मार्ग… विलीनीकरण! कपिल सिब्बल यांचा जबरदस्त युक्तिवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shinde thackeray supreme court

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. साऱ्या देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणी वेळी जोरदार युक्तिवाद करत शिंदे गटाला घाम फोडला आहे.

खंडपीठासमोर युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले, ‘घटनेच्या दहाव्या सुचीत बहुसंख्य-अल्पसंख्याक अशी संकल्पना नाही. त्यामुळे बहुसंख्य असलात तरी तुम्ही अपात्र आहात. आम्ही 34 आहोत असे म्हणण्यात कोणताही अर्थ नाही’.

या पुढे ते म्हणाले की, ‘या सगळ्यात शिंदे गटाला एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण करणे’.

पुढे काय होणार याची शिंदे गटाला कल्पना होती असंच यावरून लक्षात येत असून त्यानुसारच विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस दिली गेली होती, असाही दावा देखील सिब्बल यांनी यावेळी केला. लोकमत समूहानं या युक्तिवादासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सत्तासंघर्षाचं प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार का? SC ने निकाल राखून ठेवला, सस्पेंस कायम

दरम्यान, सत्ता संघर्षाचं हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याचा सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवण्यात आला आहे.