
पॅनकार्ड अपडेटच्या नावाखाली ठगाने महिला पोलीस शिपाईची फसवणूक केली आहे. फसवणूक प्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी त्याना एका बँकेचे खाते बंद होणार असल्याचा मेसेज आला. त्या खात्याला पॅन कार्ड लिंक करा असे त्या मेसेज मध्ये नोंद होते. खाते बंद होईल या भीती पोटी महिलेने ती लिंक उघडून त्यात माहिती अपलोड केली. माहिती अपलोड केल्यानंतर महिलेच्या खात्यातून पैसे गेले. ज्या नंबरवरून मेसेज आला होता, त्या नंबरवर महिलेने फोन केला. तो नंबर बंद येत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.































































