न्यूड सीन देणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने केल्या खासगी गोष्टी उघड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘अदाई’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री अमाला पॉल चर्चेत आली आहे. या चित्रपटामध्ये अमालाने न्यूड सीन दिलेला आहे. काही सेकंदाच्या या न्यूड सीनमुळे ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटा संदर्भात दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने काही खासगी गोष्टीही उघड केल्या आहेत.

अमाला पॉल हिचा पूर्वाश्रमीचा पती ए.एल. विजय याने दुसरे लग्न केले आहे. या दरम्यान अमाला हिला एका तरुणासोबत पाहण्यात आले आणि ती देखील दुसरे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याच संदर्भात तिला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले असता तिने ‘ते माझ्या आयुष्यातील सत्य आहे’, असे उत्तर दिले.

द हिंदू‘ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाची निवड करताना अमाला त्या खास व्यक्तीबाबत चर्चा करते. ‘अदाई’ची कथा ऐकल्यानंतरही मी सर्वात आधी त्याला याबाबत सांगितले. त्यावेळी त्याने मला या चित्रपटासाठी खास तयारी करावी लागेल असा सल्ला दिला होता. ‘अदाई’साठी 100 टक्के शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार असावे लागणार होते, असे त्याने मला सांगितल्याचे अमाला म्हणाली.

अमालाने यावेळी त्या खास व्यक्तीची ओळख मात्र लपवून ठेवली. परंतु त्या व्यक्तीने माझ्यासाठी खूप मोठे बलिदान दिल्याचेही सांगितले. अमाला म्हणाली, मला असे वाटत होते की आईसारखे बिनशर्त प्रेम आणि बलिदान कोणी देऊ शकत नाही. परंतु या व्यक्तीने मला खोटे ठरवले. त्याने माझ्यासाठी नोकरी, करिअरवर पाणी सोडले. त्याला माझ्या इच्छा माहीत आहेत आणि त्याचा पाठिंबाही असतो. तो माझ्या बाजूने उभा आहे आणि मला माझ्या चुकाही सांगतो, असेही अमाला यावेळी म्हणाली. तसेच अमालाचा बॉयफ्रेंड चित्रपटसृष्टीतील नसल्याचीही चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या