
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘मातोश्री’ निवासस्थानी शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक–पदाधिकारी दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनीदेखील अत्यंत प्रेमाने शुभेच्छांचा स्वीकार करीत सर्वांचे आभार मानले.
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे लाखो शिवसैनिक, युवासैनिकांसाठी मोठी पर्वणीच असते. त्यामुळे आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागते. आदित्य ठाकरेदेखील शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा मोठय़ा आदराने स्वीकार करीत आभार मानतात. या वर्षीदेखील मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक-युवासैनिकांचे जथेच्या जथे ‘मातोश्री’वर आले. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना नेते अनिल परब, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील राऊत, अजय चौधरी, बाळा नर, महेश सावंत, वरुण सरदेसाई, सचिन अहिर, विलास पोतनीस, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महादेव देवळे यांच्यासह प्रकाश फातर्पेकर, आशीष चेंबूरकर, विनोद घोसाळकर, विशाखा राऊत, भाऊ कोरगावकर, रमेश कोरगावकर, सुधीर साळवी, सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे, अमोल कीर्तिकर, पवन जाधव, प्रकाश आयरे, प्रवीण महाले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले.

सेल्फीची इच्छा पूर्ण झाली
आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. प्रत्येक कार्यकर्त्यासोबत आदित्य ठाकरे सेल्फी काढत होते. आदित्य ठाकरेदेखील प्रत्येक कार्यकर्त्याकडून अभिनंदन स्वीकारत प्रत्येकाला सेल्फीसाठी वेळ देत होते.

शिवसेना सचिव सुधीर साळवी, नगरसेवक सचिन पडवळ, किरण तावडे, भारती पेडणेकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

शिवसेना नेते राजन विचारे यांच्यासह ठाण्यातील शिवसैनिकांनी अभीष्टचिंतन केले. नगरसेवक निशिकांत शिंदे, युवा सेनेचे अभिषेक पाताडे यांच्यासह शिवसैनिकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्यासह शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.

शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये शिवसेना शाखा क्रमांक 191 च्या वतीने वीर सावरकर रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेना उपनेत्या व नगरसेविका विशाखा राऊत, आमदार महेश सावंत यांच्या हस्ते बहावा प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख अजित कदम, दीपाली साने, किशोर पाटील, सिद्धार्थ चव्हाण, यशवंत बिचारे, रेश्मा पाटील यांच्यासह उपस्थित होते.

शिव विधी व न्याय सेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे कायदेविषयक शिबिराचे आज आयोजन केले होते. दरम्यान, 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटपदेखील करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, उपनेत्या नगरसेवक विशाखा राऊत, आमदार महेश सावंत, माजी महापौर व नगरसेविका श्रद्धाताई जाधव, पुणे जिल्हा संपर्क संघटक मेघना काकडे यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितेश सोनवणे, उपाध्यक्षा अॅड. स्वप्ना कोदे व सरचिटणीस अॅड. मनोज काsंडेकर, संघटनेचे अॅड. गिरीश दिवाणजी, अॅड. सिद्धसेन यादव, अॅड. विजय दळवी, अॅड. भक्ती दांडेकर, अॅड. दिलीप कोकीळ, अॅड. कोजल कदम, अॅड. सोपान बुलबुले, अॅड. विकास गोरडे, अॅड. सुनील चव्हाण, अॅड. रेश्मा काळे, अॅड. तुषार जाधव, अॅड. रेश्मा ठिकार, अॅड. विनोद शिंदे, अॅड. दर्शना जोगदनकर आदी उपस्थित होते.

शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई आणि शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले.

उपनेते बबन पाटील व पनवेल तालुका संघटक रामदास पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.

दहिसर शिवसेना शाखा क्रमांक 7 च्या वतीने विभागातील नागरिकांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्या आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. विधानसभा समन्वयक प्रयेश पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला उपविभाग संघटक दीपा चुरी, शाखाप्रमुख किशोर म्हात्रे, महिला शाखासंघटक नंदा वंजारे, श्री भावदेवी मंदिराचे अध्यक्ष रमेश ठाकूर, युवा शाखासमन्वयक संकेत कदम, उपशाखाप्रमुख रवी पाटील आदी उपस्थित होते.



























































