संपूर्ण कर्जमाफी मिळवून देणारच -आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुधीर नागापुरे । माजलगाव

जरी सत्तेत असलो तरी शिवसेना हा जनतेचा पक्ष आहे. समाजकारणाच्या माध्यमातून मला प्रदूषण मुक्त, सुजलाम सुफलाम नवमहाराराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी मला आशिर्वाद द्या. आम्ही सत्तेत असलो तरी संपुर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या राज्यात निघालेल्या जनआशिर्वाद यात्रेचे रविवारी बीड जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या श्री क्षेत्र गंगामसला येथे बाल वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर वाजत गाजत जोरदार स्वागत केले, संपर्कप्रमुख आनंद जाधव,ना.जयदत्त क्षिरसागर, नेते चंद्रकांत खैरे, सचिन अहिर, आमदार राहुल पाटील, बंडू ओक,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक , कुंडलिक खाडे, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, बाळासाहेब अंबुरे, माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके यांचे नेत्रत्वाखाली गावकऱ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भालचंद्र मोरेश्वर प्रतिमा, सुंदर अशी लाकडी बैलगाडी, वारकरी संप्रदायाची ओळख असलेला टाळ, तुळशी माळ व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बागायतदार रुमाल-टोपी घालून स्वागत केले. त्यानंतर माजलगाव येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात तालुका शिवसेनेच्या वतीने आप्पासाहेब जाधव यांचेसह शिवसैनिक यांच्यावतीने ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.तेथे ठाकरे यांच्याहस्ते पाच गायीचे पूजन करून शेतकऱ्यांना गोदान करण्यात आले.