
बेकायदेशीर, घटनाबाह्य, अनैतिक… या निर्णयानंतर मिंधे भाजपच्या गद्दार सरकारसाठी हेच शब्द योग्य आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून घटनाबाह्य सरकारला फटकारले आहे.
Unconstitutional.
Illegal.
Immoral.That is the only way to look at mindhe- bjp gaddar sarkar, especially after today’s verdict.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 11, 2023
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आज राज्यपालांवर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी राज्यपालांनी घेतलेले निर्णय, बहुमत चाचणीचा आदेश, शिंदे गटाचे प्रतोद नेमणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. ”राज्यपालांनी हे बेकायदेशीर सरकार येण्यासाठी जी भूमिका निभावली व ज्या प्रकारे मदत केली ते आता समोर आलं आहे. ते राज्यपालांसारखे नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वागत होते. आता त्यांच्यात जर थोडी तर नैतिकता व लाज बाकी असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. सत्तेची लालसा यात दिसून येतेय. पण नैतिकता आणि घटना ही सर्वोच्च आहे’, असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
The role and assistance of the earlier governor in the hostile take over of government, and suppressing democracy and the constitution is evident.
He acted as a Party man, not as a Governor.If there’s any morality and shame left, the unconstitutional cm should resign.
Their…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 11, 2023



























































