सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अध्यादेशाने बदलण्याचा घाट, मोदींना हुकूमशहा म्हणत आप नेत्याची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदली, नियुक्त्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल कचर्‍याच्या पेटीत टाकून उपराज्यपालांना अधिकार बहाल करणाऱ्या केंद्राच्या अध्यादेशावर सर्वत्र कडाडून विरोध होताना दिसत आहे. आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग यांनी नरेंद्र मोदी हे हुकूशहा असून त्यांना देशाला धाकात ठेवायचं आहे, अशी टीका केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जर एका अध्यादेशाने रद्द करता आलं तर या देशात संविधान, लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालय शिल्लक राहणार नाही. नरेंद्र मोदी हे एक हुकूमशहा आहेत, त्यांना सगळ्या देशाला धाकात ठेवायचं आहे. सर्व विरोधी पक्षांनी या हुकूमशाहीचा विरोध करावा, असं आवाहन सिंग यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, जर काँग्रेस या अध्यादेशाला योग्य मानत असेल तर तो यात भाजपची साथ देत आहे, असं समजावं लागेल. जेव्हा भाजप भ्रष्टाचाराविषयी बोलतो तेव्हा ओसामा बिन लादेन याच्या तोंडून अहिंसेवर तत्वज्ञान ऐकल्यासारखं वाटतं, असं टीकास्त्रही सिंग यांनी सोडलं आहे.