
सामना ऑनलाईन | लंडन
खरं तर यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला एबी डिव्हिलियर्सची गरज होती. मात्र, तो पैशाच्या मागे पळणारा खेळाडू निघाला. आयपीएल व पीएसएल या टी-20 स्पर्धेत खेळण्यासाठीच त्याने मागच्या वर्षी निवृत्ती घेतली, असा घणाघाती आरोप पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला. अख्तरने यु टय़ुबवर डिव्हिलियर्सवर टीका करणारा व्हिडिओ अपलोड केला. डिव्हिलियर्सच्या पैसे कमाविण्यावर माझा अक्षेप नाही. मात्र, त्याने आधी देशाला प्राधान्य द्यायला हवे होते असे अख्तर म्हणाला. वर्ल्डकपसाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असताना डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा होण्यापूर्वी एक दिवस आधी त्याने वर्ल्डकप खेळण्याची इच्छा बोलून दाखविली. पण बोर्डाने मात्र त्याला साफ नकार दिला.




























































