तहसिलदाराच्या घरी सापडलं लाखोंचं घबाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

एका तहसिलदाराच्या घरावर घातलेल्या धाडीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लाखोंची संपत्ती सापडली आहे. यात 93 लाखांची रोख रक्कम आणि काही लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

ही धाड तेलंगाणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात घालण्यात आली. लावण्या असं या तहसिलदाराचं नाव आहे. ही अवैध संपत्ती जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांनी लावण्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.