
सामना प्रतिनिधी, आष्टी
नगर-बीड राज्यमार्गावरील तालुक्यातील पोखरी शिवारातील पोल फॅक्टरीजवळ ट्रक व इर्टिका कारची समोरासमर धडक होऊन चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना दि. 17 मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली.
जामखेडकडे जाणारा ट्रक क्र. ए.पी.-39 यु.- 2447 व नगरकडे जाणारी इर्टिका क्र. जी.जे. 15 सी.डी.6081 ची तालुक्यातील पोखरी शिवरातील पोल फॅक्टरीजवळ आल्यानंतर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातामध्ये नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे आणि सात वर्षीय अनिकेत चमकुरे (सर्व राहणार मुखेड, जि.नांदेड) यांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये एक महिला, दोन पुरुष व 7 वर्षीय मुलाचा समावेश आहे. अपघातातील दोन व्यक्तींचा जागीच जागीच मृत्यू झाला तर दोन व्यक्तींचा उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

























































