
सामना प्रतिनिधी । नगर
शहरातील तोफखाना परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता कारवाईला सुरुवात झाली. या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे झाली होती. त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश देण्यात आले होते. कारवाई होत नसल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांना लोकायुक्तांनी अहवाल मागवला होता. त्यामुळे मनपाने शुक्रवारी सकाळी कारवाईला सुरुवात केली.
या कारवाईत सुमारे 103 गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.


























































