आकाश भडसावळेचा नाटय़प्रयोगांचा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता आकाश भडसावळे याने एकाच दिवसात सलग 12 प्रयोगांचा विक्रम केला आहे. आकाशने तीन नाटकांचे प्रत्येकी चार प्रयोग रविवारी ठाणे आणि मुलुंड येथे सादर केले.

येगेश सोमण लिखित सस्पेन्स ‘टेलिपथी’, सुयश पुरोहित लिखित व दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी ‘मरणोत्पात’ आणि इरफान मुजावर लिखित ‘अस्थिकलश’ अशी आकाश भडसावळेने सादर केलेल्या नाटकांची नावे आहेत. ‘करनाटकू’ संस्थेची निर्मिती आणि ‘अभिजात’ च्या पाठिंब्याने हा विक्रम झाला. या प्रयोगांचे व्यवस्थापन राकेश तळगावकर, तसेच सूत्रधार सुरेश भोसले होते.

आकाश भडसावळे त्याच्या चरित्र भूमिकांसाठी ओळखला जातो. ‘होय मी सावरकर बोलतोय’ ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकांतील त्याच्या भूमिका गाजलेल्या आहेत. सध्या ‘वासूची सासू’ हे त्याचे विनोदी नाटक गाजतंय. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षाचे औचित्य साधून आकाशने मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी तीन क्रांतिकारी नाटकांचा महोत्सव केला होता.