कोरोना वॉरियर्सच्या मदतीला धावला सलमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू झाले आहेत. याच दरम्यान अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीसाठी धावून आला आहे. बीईंग ह्युमन या संस्थेमार्फत तो पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची काळजी घेत आहे.

बीईंग हंग्री या नावाने सलमानच्या संस्थेचा ट्रक सध्या मुंबईतील रस्त्यांवर फिरताना दिसतोय. याद्वारे फ्रंटलाईन वर्कर्सना चहा, खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. सलमान खान आणि राहुल कनाल हे दोघे मिळून ही मदत करतायत.