
प्रसिद्ध अभिनेता युसुफ हुसैन यांचे शनिवारी कोरोनाने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हुसैन हे निर्माता हंसल मेहता यांचे सासरे आहेत. हंसल मेहता यांना भावपूर्ण शब्दांत आपल्या श्वशुरांविषयी कृतज्ञता आणि श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
त्यांना आतापर्यंत धूम 2, रईस, रोड टू संगम, ओ माय गॉड, दबंग 3 अशा काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिषेक बच्चनच्या आगामी बॉब बिस्वासमध्येही ते काम करत होते.



























































