पुन्हा नकारात्मक भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तुझ्यात जीव रंगला’मधील वहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. वहिनीसाहेबांचा धाक आणि दरारा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून ही मालिका 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल. भूमिकेबद्दल धनश्री म्हणाली, ‘या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचे नाव शिल्पी आहे, जी तिच्या माहेरी येऊन राहतेय आणि तिला सतत असे वाटतेय की तिच्या आयुष्यात जे काही चुकीचे घडले त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त अश्विनी वहिनी आहे. त्यामुळे शिल्पी अश्विनीला सतत घालूनपाडून बोलते, प्रत्येक गोष्टींमध्ये तिच्या चुका काढते. अशा प्रकारची एक नकारात्मक भूमिका पुन्हा एकदा मी साकारतेय. त्यामुळे जशी वहिनीसाहेब सगळय़ांच्या लक्षात राहिली तशीच शिल्पीदेखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशी मी आशा करते.’