
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सकाळी 11 वाजेच्या सुमारास लखनऊ विमानतळावर आगमन झालं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना पत्रकारांनी गराडा घातला. प्रभू श्रीरामाकडे काय मागणे मागणार असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, लोकांसाठी काम करत असताना जे काम हाती घेतले आहे ते चांगले होऊ दे अशी प्रार्थना आपण देवाजवळ नेहमी करत असतो. देवळात गेल्यानंतर मी देवाकडे मागणं मागण्यापेक्षा मी देवाचे आशिर्वाद घेत असतो. आतापर्यंत सेवा करण्याची संधी दिली आहे त्यासाठी मी धन्यवाद देत असतो असे आदित्य यांनी सांगितले.
View this post on Instagram
शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज बुधवारी अयोध्येत येत आहेत. या दौऱ्यात ते रामलल्लांचे दर्शन घेणार असून संध्याकाळी शरयू नदीच्या काठावर होणाऱ्या आरतीतदेखील ते सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची विस्तृत माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. अयोध्या आणि शिवसेनेचे खूप जुने नाते आहे. पहिल्यांदाच नाही तर अनेकवेळा आम्ही येथे आलो आहोत. राममंदिरासाठी 1992 मध्ये झालेल्या आंदोलनात शिवसेनेचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सकाळी 11 वाजेच्या सुमारास लखनौ विमानतळावर आगमन झालं. यावेळी ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. #shivsena #AadityaThackeray pic.twitter.com/zZOvH1xByt
— Saamana (@SaamanaOnline) June 15, 2022
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला आले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या भेटीचे दोन वर्षांपासून नियोजन केले जात होते, पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. हा दौरा राजकीय नाही, मात्र काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.दरम्यान, आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी भेट देणार आहेत त्या ठिकाणांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली.
View this post on Instagram
अयोध्या भगवामय
रामनगरी अयोध्येत आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. लखनौ विमानतळापासून अयोध्येकडे जाणारे मुख्यमार्ग व ठिकठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स व पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी लावण्यात आलेले भगवे ध्वज आणि कमानींमुळे अयोध्या परिसर भगवामय झाला आहे.




























































