नवा हिंदुस्थान बनवायचा आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

काँगेसने गेल्या 15 वर्षांत कोणता विकास केला असा सवाल शिवसेना नेते, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी  गुरुवारी पारशिवनी येथील जाहीर सभेत केला. नवा हिंदुस्थान बनवायचा असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे आवश्यक आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिवसेना-भाजप व रिपाइं युतीचे रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारार्थ पारशिवनीच्या बसस्टँड परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला शिवसेना संपर्क नेते डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. राजू पोद्दार, आमदार गिरीश व्यास, शिवसेनेचे संपर्क नेते सुधीर सूर्यवंशी, युवासेनेचे नेते अंकित प्रभू आदी उपस्थित होते.

बावनकुळे यांनी आपल्या भाषणात नागपूर व विदर्भावर काँगेस सरकारने अन्याय केल्याचा आरोप केला. हाच धागा पकडून आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हीही म्हणतो मुंबईवर काँगेसने अन्याय केला. राज्याच्या विकासासाठी व समतोल साधण्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून देणे आवश्यक आहे.