
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे रखडवणाऱया कंत्राटदाराची शुक्रवारी सुनावणी होती. या सुनावणीत नेमके काय झाले, मुंबईकरांना वेठीला धरणाऱया या कंत्राटदाराची सुनावणी झाली की नाही, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना केला आहे.
मुंबई महापालिकेने सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कंत्राट पाच कंत्राटदारांना दिले आहे. यात दोन वर्षांत मुंबईच्या रस्त्यांचे पूर्णपणे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मात्र, 10 महिने झाले तरी यातील बहुतांश रस्त्यांची कामे अर्धवट आहेत तर काही ठिकाणी कामे सुरूच झालेली नाही. रस्त्यांची कामे रखडल्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने रखडलेल्या कामांबाबत कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. या नोटिसीमध्ये पंत्राटदाराची सर्व अनामत रक्कम जप्त करण्याचा आणि काम काढून घेण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबत आज मुंबई महापालिकेत आयुक्तांसमोर सुनावणी होणार होती.
– मुंबई महापालिकेने 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवून या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली होती. त्यानंतर कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेला उत्तर प्राप्त झाल्यानंतर यातून मुंबई महापालिकेचे समाधान न झाल्याने कंत्राटदाराला सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले होते.
पालिका काय करणार
– मुख्यमंत्र्यांचा मित्र असलेल्या या कंत्राटदाराला कंत्राटघेऊनही काम न करण्याबद्दल ब्लॅकलिस्ट करणार का? की खोके सरकारशी झालेल्या तडजोडीनुसार फुटकळ कारणांच्या आधारे या कंत्रादाराला बजावलेली नोटीस मागे घेणार?
– मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यात एक हजार कोटींची कामे घेतलेल्या दुसऱया कंत्राटदारांबाबत मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यासदेखील मी उत्सुक आहे.
– हा कंत्राटदार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे असं समजतंय. चिपळूणमध्ये नुकत्याच कोसळलेल्या पुलाचे कामदेखील या पंत्राटदाराकडेच होते.


























































