
अफगाणिस्तानने हिंदुस्थानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. ही मालिका नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. अफगाणिस्तानने हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेसाठी स्टार खेळाडूंनी भरलेला संघ जाहीर केला आहे. रशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचे यावेळी संघात पुनरागमन झाले आहे.
अफगाणिस्तानचा संघ ः इब्राहिम झादरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), सादीपुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबद्दीन नायब, नूर रहमान, मोहम्मद नबी, रशीद खान, नंगयाल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन अहमद उल हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.
राखीव खेळाडू ः शाहदुल्ला कमाल, फरीद अहमद मलिक, इजाज अहमदझाई.




























































