
सामना ऑनलाईन । अॅडलेड
अफगाणिस्तानचा फिरकीपटू आणि टी-20 क्रमवारीमध्ये नंबर एकवर असलेल्या राशिद खानच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. वडिलांच्या निधानानंतरही राशिद खान मैदानावर उतरला आणि दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
आयसीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आपल्या अनोख्या शैलीने मैदानावर फलंदांना पळता भूई करणारा अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान याच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतरही राशिद बिग बॅश लीगमधील सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला. सिडनी थंडरविरुद्धच्या सामन्यात अॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना राशिदने दोन बळी घेत संघाला 20 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
“I don’t have high enough words.”
Rashid Khan’s Strikers ‘brothers’ rallied around him on an emotional day.
➡️ https://t.co/qWLkmIw6zC pic.twitter.com/UMN2NyH4Fg
— ICC (@ICC) January 1, 2019
प्रथम फलंदाजी करताना अॅडलेड स्ट्रायकर्सने 20 षटकांत 4 बाद 175 ठोकल्या होत्या. यानंतर राशिद खानच्या गोलंदाजीसमोर सिडनीचा संघ 20 षटकात फक्त 6 बाद 155 धावा करू शकला आणि अॅडलेड स्ट्रायकर्सने 20 धावांनी विजय मिळला.
राशिदचे भावून ट्वीट
वडिलांच्या निधनानंतर राशिद खान भावूक झाला. ‘आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला गमावले आहे. ते म्हणजे माझे वडील. तुम्ही नेहमी मला खंबीर राहायला सांगत का होते, ते मला आज उमगले,’ असं त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
Today I lost the most important person in my life,father-the everlasting candle.Inna lillahi wa inna ilayhi raji’un.
Now I know why u always asked me to be strong,bcz u knew that today I would need the strength to bear your loss.Will be always in myI miss u #plztalktomeOnce pic.twitter.com/BGIHaqKVbx— Rashid Khan (@rashidkhan_19) December 30, 2018
सचिनच्या आठवणी जाग्या झाल्या
1999 च्या विश्वचषकादरम्यान सचिन तेंडुलकरच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतरही सचिनने मैदानात उतरून केनियाविरुद्ध नाबाद 140 धावांची खेळी केली होती. या शतकानंतर सचिनच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. सचिनने हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केले होते.





























































