गणेशोत्सवानंतरही रत्नागिरीत नगर परिषदेचे कृत्रिम तलाव तसेच; परिसरात डासांचा प्रादुर्भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी नगरपरिषदेने गणेशोत्सवाच्या काळात गणपती विसर्जनासाठी माळनाका येथे कृत्रिम विसर्जन तलाव तयार केला होता. गणेशोत्सव संपला तरी अजून हा कृत्रिम तलाव तसाच ठेवण्यात आला आहे. तो बुजवण्यात आलेला नाही. परिसरातील नागरीकांना त्याचा त्रास होत असून त्यात साठलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच सर्वत्र डेंग्यू, मलेरियाची साथ असताना डास वाढले आहेत. त्यामुळे हा कृत्रिम तलाव तातडीने हटवावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

कोरोना काळापासून रत्नागिरी शहरात गणेशोत्सवाच्या काळात कृत्रिम तलाव ही संकल्पना राबवण्यात आली. त्यानंतर ही संकल्पना पुढेही कायम ठेवण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात गणपती विसर्जनासाठी शहरात काही ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले. रत्नागिरी नगरपरिषदेने हे कृत्रिम तलाव तयार केले. शहरातील माळनाका येथेही कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे. गणेशोत्सव संपला तरी हे कृत्रिम तलाव तसेच ठेवण्यात आले आहेत. कृत्रिम तलावातील पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या रत्नागिरीत डेंग्युची साथ आहे. अशावेळी कृत्रिम तलाव वेळीच बुजवावे अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.