रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन तो पोलिसांसमोर हजर झाला

49

सामना प्रतिनिधी। लातूर

पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून तिची निघृण हत्या केल्यानंतर रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह एकजण पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घ़डली आहे. सिध्दाजी चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. तर आरती असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, सिध्दाजी याने पत्नीची हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेणापूर तालुक्यातील मौजे खानापूर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडीसह एक तरुण आल्याचे बघून सगळे पोलीस ठाणे हादरले. पोलिसांनी काही विचारण्याच्या आतच त्या तरुणाने आपलं नाव सिध्दाजी चव्हाण असल्याचं पोलिसांना सांगितलं. तसंच “मी आताच पत्नीची कुऱ्हाडीने घाव करुन हत्या केली आहे.” अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली व आपला पत्ताही सांगितला. त्यानंतर सिद्धाजीला अटक कऱण्यात आली. नंतर पोलिसांनी सिद्धाजीचे घर गाठले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आरतीचा मृतदेह पोलिसांना आढळला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या