
रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहातील 8 कंत्राटी कर्मचाऱ्यांना थकलेल्या दोन महिन्यांच्या पगारापैकी एक महिन्याचा पगार मिळाला आहे. अजूनही कर्मचाऱ्यांना दुसऱ्या महिन्याच्या पगाराची प्रतिक्षा आहे. दोन महिने पगार थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाला टाळे ठोकून संप पुकारला होता.
दोन महिने 8 कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे त्यांनी संपाचे हत्यार उपसताच नगरपरिषद प्रशासनाला जाग आली. त्यांनी पगार देतो सांगून कर्मचाऱ्यांची समजूत काढत त्यांना पुन्हा कामावर हजर होण्यास सांगितले. त्यानंतर कर्मचारी दुपारनंतर कामावर रुजू झाले. त्यानंतर बुधवारी दोन महिन्यांपैकी एका महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. अजूनही एक महिन्याच्या पगाराची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे.

























































