
मुंबई-महाराष्ट्रासह देशात चार दिवस काहीशी नियंत्रणात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 10 हजार 542 कोरोनाबाधित आढळले असून तब्बल 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 63 हजारांवर पोहोचली आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
देशात 13 एप्रिल रोजी सर्वाधिक 11 हजार 109 रुग्ण आढळले होते. यानंतर गेल्या चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांपर्यंत खाली आली होती. मात्र आज रुग्ण संख्येने पुन्हा उसळी घेतली आहे. विशेष म्हणजे 38 मृत्यू ही वर्षातील सर्वाधिक मृत्यू संख्या आहे. तर 24 तासांत … रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 63 हजार 562वर पोहोचली आहे. सोमवारी ही संख्या 61 हजार इतकी होती.
राज्यात चार जण दगावले
राज्यातही रुग्णवाढ सुरू असून गेल्या 24 तासांत 1100 कोरोनाबाधित आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 1112 जणांनी कोरोनावर मात केली असली तरी नव्या रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णांचा आकडा 6102वर राहिला आहे.
असे वाढले रुग्ण
13 एप्रिल – 11 हजार 109
14 एप्रिल – 10 हजार 775
15 एप्रिल – 10 हजार 093
16 एप्रिल – 9 हजार 111
17 एप्रिल – 7 हजार 633
दिवसभरात
देश – 10542
राज्य – 1100
मुंबई – 234


























































