
मूल जन्माला येणे हा जोडप्याच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण. या जगात आल्यानंतर बाळाचं पहिलं रडणं, त्याचे मिचमिचे डोळे, अलगद हातावर उचलल्यावर होणारा पहिला स्पर्श… सारंच कल्पनेपलीकडलं असतं. आयुष्यभराच्या आठवणी असतात या… मनाच्या कप्प्यातील या आठवणी फोटोच्या रूपाने मिळाल्या तर… यालाच बर्थ पह्टोग्राफी म्हणतात. याच संकल्पनेवर गेले वर्षभर नगरचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. अमोल जाधव काम करत आहेत. वर्षभरात त्यांनी कित्येक जोडप्यांना जन्मसोहळ्याच्या क्षणांची अनमोल भेट दिली आहे.
आपल्या देशात डोहाळ जेवण किंवा प्रीवेडिंग फोटोशूट मोठय़ा प्रमाणात होते. बर्थ पह्टोग्राफी ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय आहे. आपल्याकडे तितकीशी ही संकल्पना रुजलेली नाही. नगरचे प्रसिद्ध स्त्र्ााrरोगतज्ञ डॉ. अमोल जाधव त्यांच्या सरस्वती हॉस्पिटलच्या मार्फत बर्थ पह्टोग्राफी संकल्पनेचा प्रसार करत आहेत. टिपिकल प्रॅक्टिस करण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा डॉ. जाधव यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सरस्वती हॉस्पिटलच्या मार्फत ते नव्या संकल्पना राबवत असतात. 2018 साली त्यांनी गरोदर मातांचा आगळावेगळा फॅशन शो आयोजित केला होता. ‘पुणी तरी येणार गं’ असे फॅशन शोचे नाव होते. स्त्र्ााrभ्रूणहत्या विरोधी जागृती हा शोचा उद्देश होता.
बर्थ पह्टोग्राफी त्यांनी गेल्या वर्षी सुरू केली. बाळाचे पहिले रडणे, आईबाबांसोबतचा पहिला स्पर्श, डॉक्टर पहिल्यांदा बाळाला बाहेर काढतानाचा क्षण ते पॅमेऱयात पैद करून ज्या पालकांना हवे असतात, त्यांना देतात. या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. डिलिव्हरी झाल्यावर बाळ-बाळंतीण घरी जाण्यापूर्वी सेलिब्रेशन केले जाते.
































































