नगर- क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरामध्ये असलेल्या क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आज महानगरपालिकेने या ठिकाणी असलेले अतिरिक्त बांधकाम रविवारी सकाळी पडण्यास सुरुवात केल्यामुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यासंदर्भात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी वेळोवेळी ठेकेदारांना सूचना देऊन त्यांनी त्याचे पालन केले नाही, त्यामुळे अतिरिक्त बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नगरमध्ये वडिया पार्क क्रीडांगण असून ती जागाही क्रीडा संकुल समितीला देण्यात आली होती. पूर्वी ही जागा महानगरपालिकेची होती. पालिकेला ती जागा दिल्यानंतर या ठिकाणी क्रीडा संकुल तसेच व्यापारी वर्गासाठी गाळे सुद्धा उभारण्यात आले. उपलब्ध करून देण्यात आलेले संबंधित गाळे ठेकेदाराने पार्किंगच्या जागा न सोडता या ठिकाणी परस्पर बांधकाम केले होते. त्यावर महानगरपालिकेने सुद्धा त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर हा वाद महसूल विभागात गेला आणि तो आजही न्यायालयामध्ये सुरू आहे

दुसरीकडे या संकुलामध्ये संबंधित ठेकेदारान गाळे बांधण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळेला त्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. मात्र संबंधित ठेकेदाराने अधिकच बांधकाम करून या ठिकाणी व कार्यालय करण्याचा धडाका सुरू केला होता. रविवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेले हे अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकाम तोडले. यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे प्रभाग अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.