
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमध्ये (एआयसीटीई) विविध जागांसाठी भरती सुरू असल्याचे सांगून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. एआयसीटीईने त्याची गंभीर दखल घेतली आहे. एआयसीटीईचे अधिकारी असल्याचे सांगून ही फसवणूक होत आहे. असे तोतया अधिकारी आढळल्यास त्याची माहिती तातडीने एआयसीटीईला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
काही अज्ञात व्यक्ती एआयसीटीईचे अधिकारी असल्याचे सांगून इच्छुक उमेदवारांना गाठत आहेत. एआयसीटीईमध्ये तालुका व जिल्हा समन्वयक, झोनल अधिकारी, झोनल प्रमुख आदी पदांसाठी भरती असल्याचे ते सांगत आहेत. मात्र तशी कोणतीही भरती नसल्याचे एआयसीटीईने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अशा लोकांपासून सावध रहावे अन्यथा फसवणूक झाल्यास एआयसीटीई जबाबदार राहणार नाही असेही कळवण्यात आले आहे.
गेल्या सप्टेंबरमध्येही एआयसीटीईने भरतीच्या बोगस वेबसाईट्सबद्दलही सर्वांना सावध केले होते. कोणतीही माहिती घ्यायची असेल किंवा आर्थिक व्यवहार करायचे असतील तर एआयसीटीईच्या www.aicedte-iåieda.org या अधिकृत वेबसाईटवरूनच करावेत असेही कळवण्यात आले आहे.
.
..या आहेत बोगस वेबसाईट
www.aicedtsd.comed
www.aicedtetiåieda.org



























































